सिद्धार्थ बुद्ध विहार कमिटी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी, सिद्धार्थ नगर ठाणे  पूर्व यांच्या वतीने  सॅनिटायझर, मास्क व हॅन्डग्लोज देण्यात आले

ठाणे (दीपक जाधव) : देशामध्ये कोरोना वायरसने विळखा घातल्यापासून देश लॉकडाउन मध्ये आहे. परन्तु अश्या या सलाखाच्या परिस्थिति मध्ये आपल्या जीवाची परवा न करता आपल्या घरातील कचरा, आपल्या आजुबाजुच्या परिसरातील ओला आणि सूखा कचरा रोज नियमित न चुकता गोळा करतात आणि आपला संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवतात. उसे हे सफाई कामगार आहेत म्हणून आपण स्वच्छ शहर आणि परिसर ठेवू शकतो.


अश्या या सफाई कामगारांना सिद्धार्थ बुद्ध विहार कमिटी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी, सिद्धार्थ नगर ठाणे 
पूर्व यांच्या वतीने  सॅनिटायझर, मास्क व हॅन्डग्लोज देण्यात आले त्या प्रसंगी कमिटी  अध्यक्ष मिलिंद अहिरे, सल्लागार  दीपक जाधव, जयेश बनसोडे, पप्पू जंगम, प्रफुल भालेराव, प्रदीप सरोदे आदि उपस्तिति होते. .