पुणे (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळात पोलीस रस्त्यावर उतरुन आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. त्यांना वेळेत घरी जाताही येत नाही. त्यामुळे कुटुंबियांसाठी लागणाऱ्या दररोजच्या वस्तूही त्यांना नेता येत नाहीत. त्यांची ही अडचण लक्षात घेऊन पुणे पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसाठी रोजच्या साठी लागणाऱ्या वस्तूंची घरपोच सेवा सुरु केली. त्यांना विनामूल्य कांदा, बटाटा, सॅनिटायझर यासारख्या वस्तू दिल्या जात आहेत.
पुणे पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसाठी रोजच्या साठी लागणाऱ्या वस्तूंची घरपोच सेवा सुरु केली