कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे विशेष रुग्णालयात रुपांतर करण्यासंदर्भात चर्चा सुरु

कोल्हापुर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे विशेष रुग्णालयात रुपांतर करण्यासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे. जिल्हा प्रशासनाने शिवाजी विद्यापीठाकडे एक हजार बेडची मागणी केली आहे. इथल्या वसतिगृहात आयसोलेशन रुग्णालय करण्याची प्रशासनाची तयारी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या वसतिगृहात हे रुग्णालय उभारण्याचा मानस असून आगामी काळात होणाऱ्या परीक्षा लक्षात घेऊन कोणत्या इमारतीमध्ये हे रुग्णालय उभा करायचं यावर चर्चा सुरु आहे.