सध्या तरी आरोग्य सुविधा, पोलीस, माध्यमं आणि जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी भारतात अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंमध्ये येतात. कोणत्या देशात कोणत्या वस्तू अत्यावश्यक कॅटेगरीत मोडतात यावरुन त्या देशातील संस्कृती समजते.
मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यातून अत्यावश्यक सेवा आणि वस्तू वगळण्यात आला आहे. जगभरातही अशाच प्रकारे लॉकडाऊन अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र, प्रत्येक देशातील अत्यावश्यक गोष्टी या तिथल्या संस्कृतीप्रमाणे असल्याचे पाहायला मिळत आहे. उदाहरणचं द्यायचं झालं तर अमेरिकेत बंदुक अत्यावश्यक गोष्टीमध्ये येते तर, फ्रान्समध्ये चॉकलेटला अत्यावश्यक मानले जात आहे. अनेक देशांमध्ये तर दारुचाही अत्यावश्यक गोष्टीत समावेश करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सेवा आणि वस्तू वगळण्यात आल्या आहेत. कोणत्या देशात कोणत्या वस्तू अत्यावश्यक कॅटेगरीत मोडतात यावरुन त्या देशातील संस्कृती समजते. लॉकडाऊनमध्येही नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून जगभरात जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा चालू आहे. पण देशांबरोबरच जीवनावश्यक वस्तूंची यादीही बदलते.
फ्रान्स...
फ्रान्समध्ये चक्क चॉकलेटच्या दुकानांवर बंदी नाही. तिथे खास चॉकलेटसाठी दुकानं आहेत आणि ते लॉकडाऊनमध्येही चालू आहेत. कारण फ्रेंच लोक हे चॉकलेटच्या बाबतीत खूप आग्रही आहेत. त्याच बरोबर चीझ, बेकरी आणि वाईन शॉपही फ्रान्समध्ये चालू आहेत.
अमेरिका..
अमेरिकेत बंदुका अत्यावश्यक सेवेमध्ये मोडतात. त्यामुळे बाकी अनेक दुकानं बंद असली तरी बंदूकांची दुकानं चालू आहेत. एवढंच नाही तर लॉकडाऊनमध्ये बंदुकांची विक्रीही वाढली आहे. त्याचबरोबर चक्क मॅरियुआना म्हणजेच गांजा हा देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. अर्थात त्याचा वापर मेडिकल पर्पजसाठी होणं अपेक्षित आहे. पण अमेरिकेत हे नियम वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे आहेत.
ऑस्ट्रेलिया..
ऑस्ट्रेलियाने चक्क लहान मुलांच्या खेळण्यांची दुकानं अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश केलाय. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियात वाईन शॉपही चालू आहेत.
स्विडन..
या देशाने तर देशांतर्गत पर्यटनही चालू ठेवलंय. नागरिकांना मानसिक आणि शारिरिक दुष्ट्या सुदृढ ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे असे तिथल्या सरकारला वाटते. स्विडनची लोकसंख्या कमी असलेल्या लॉकडाऊनची गरज नाही असं इथल्या सरकारला वाटतं. पण 50 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, त्याचबरोबर सोशल डिस्टंसिंगचं पालन करावं एवढीचं अपेक्षा स्विडीश सरकारला आहे आणि त्यांचा त्यांच्या नागरिकांवर तितका विश्वासही आहे.