मुलुंड (नागसेन शिरसाठ) : आज गेल्या काही दिवसांपासून देश लॉकडाउन मध्ये आहे. गरीबापासून श्रीमंतानपर्यत सगळे फ़क्त घरात बसलेले दिसून येत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलेले आदेश पाळत आहेत. रोजनदारी वर काम करणारा वर्ग असो किवा ड्राइवर म्हणून काम करणारा व्यक्ति असो याना पैश्याची चनचन ही भासत च आहे परन्तु राज्य सरकारने ३ महीने धान्य मोफत मिळणार असे जाहिर केले आहे म्हणून त्यांचा थोड़ा फार त्राण हा कमी झालेला दिसत आहे.
आज आपन बघतो आहोत की रस्त्यावर किवा घराबाहेर फ़क्त पोलिस कर्मचारि, डॉक्टर, सफाई कामगार हे आपल्यासाठी दिवस रात्र बाहेर काम करत असताना दिसत आहेत, पण याउलट आणखी कोणीतरी घराबाहेर रोज पडत आहे ती व्यक्ति म्हणजे प्राणी प्रेमि...
गेल्या कित्येक वर्षांपासून न चुकता मुलुंड मधील कही रहिवासी ज्यांचे नाव आहे असीत सोनी, यशवंत भानुशाली, शुभांगी भुवड , कीर्ति भानुशाली, जयेश अठा आणि रोहित जोशी हे सगळे जन लॉकडाऊन सुरु आहे...स्वताच्या जीवाची भीति त्यांना देखील आहे परन्तु आज इतक्या वर्षांपासून ते नियमित गाइला चारा आणि पौष्टिक असा पालेभाजी आहार देत आहेत.म्हणून आजच्या तारखेला देखील ते स्वताच्या जीवाची काळजी न करता नियमित पने गाइला सकस असा आहार मुलुंड गोशाला या ठिकाणी नेऊन पोचवत आहे. याठिकाणी कमित कमी ३००+ गाई आहेत. त्यांच्या या कामगिरीला राजकीयदर्शन वृत्तपत्राच्या समूर्ण टीम कडून सलाम असो.
एकीकडे आपल्याला अस वाटत की आपल्या घरामध्ये भरलेले राशन हे आपल्याला पुरेल की नाहीं तर दुसरीकडे आज अशी ही लोक अजुन आहेत की जे स्वतापेक्षा जास्त मुक्या जनावरांना अन्न मिळेल की नाही याचा विचार आधी करतात. प्रत्येकाच्या मनातला प्राणी प्रेम नावाचा व्यक्ति जर जागा झाला तर रस्त्यावरील प्राणी हे कधीच उपाशी राहणार नाहित.