देशातील सर्वाधिक कोरोनाचा प्रभाव मुंबई शहरावर झाला आहे. अशातच कोरोनाबाबात जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिस हटके स्टाइलचा वापर करत आहेत.
मुंबई (प्रतिनिधी) : संपूर्ण देशात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित मुंबई शहरात आहेत. अशातच मुंबईतील कोरोनाचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेसोबतच मुंबई पोलिसांकडूनही अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. अशातच मुंबई पोलीस लोकांना समजवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहेत. अशातच मुंबई पोलिसांनी लोकांना समजवण्यासाठी मीम्सचा आधार घेतला आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या अभियानात आलिया भट्टला सहभागी करून घेतलं आहे. यामार्फत पोलिसांनी कोविड-19 चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी घरामध्ये राहण्यासाठी प्रेरित केलं आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर मुंबई पोलिसांनी 'गली बॉय' चित्रपटातील लूकमध्ये हसणाऱ्या आलिया भट्टचा एक फोटो शेअर केला आहे. मीम्समध्ये लिहिल्यानुसार, 'हा तो चेहरा आहे, जो लॉकडाऊनमध्ये घरातून बाहरे फिरण्यासाठी जात आहे, असं कोणीतरी सांगितल्यावर होतो.'
मुंबई पोलिसांनी या मीम्ससोबत एक कॅप्शन लिहिलं आहे आणि ट्वीट केलं आहे. 'एबॉर्ट मिशन. आम्ही पुन्हा सांगतोय : एबॉर्ट मिशन!' तसेच यासोबत #StayHome #StaySafe हे हॅशटॅगही दिले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी बॉलिवूड सेलिब्रिटी, त्यांचे चित्रपट आणि लोकप्रिय ऑन स्क्रिन पात्रांच्या विशेषतेचे अनेक ट्वीट्स पोस्ट केले आहेत. यामध्ये लोकांना लॉकडाऊन दरम्यान, घरीच राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.'
मुंबई पोलिसांच्या ट्वीटमध्ये आलिया पहिल्यांदाच दिसून आली आहे. याआधी त्यांनी घरातच राहण्याचं आवाहन करण्यासाठी लोकप्रिय चित्रपटांच्या नावांचा उपयोग करत एक संदेश दिला होता. त्यांनी ट्वीट केलं होतं की, 'मुंबईकर, आम्ही आशा करतो की, तुम्ही सगळेजण मिस आलियाच्या बोलण्याशी 'राजी' आहात. कामाशिवाय 'गली'मध्ये जाऊ नका आणि आपल्या डियर जि़ंदगी' काळजी घ्याल.