सांगली (प्रतिनिधि) : शहर पोलीस ठाण्यातील सर्व महिला पुरुष कर्मचाऱ्यांची आणि शहरात तैनात असलेल्या होमगार्डची तपासणी करण्याचे काम करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि या सर्व पार्श्वभूमीवर नाकाबंदी आणि अन्य गोष्टींसाठी पोलिसांची 24 तास ड्युटी सुरू आहे . नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी केली जाते अशा परिस्थितीत पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. अशावेळी पोलीस सुरक्षित राहावेत आणि त्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून जिल्हा पोलिस दलाने पोलिस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचे काम आजपासून सुरू केलेय.
सांगली जिल्हा पोलिस दलाने पोलिस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचे काम आजपासून सुरू केलेय.