राज्य सरकारवर भाजपकडून टीका करण्यात येत होती. त्यानंतर आता या वादात बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीनेही उडी घेतली आहे.
मुंबई (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील मजुरांचा उद्रेक पाहायला मिळाला. ठाण्यातील मुंब्रा आणि मुंबईतील वांद्रा येथील रेल्वे स्थानकावर या मजुरांनी मोठी गर्दी केली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन करण्यात येत असताना ही गर्दी झाल्याने राज्य सरकारवर भाजपकडून टीका करण्यात येत होती. त्यानंतर आता या वादात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिची बहिणी रंगोली चंडेल हिनेही उडी घेतली आहे.
'मुंबईची दुसरी इटली होणार...आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वाची गरज आहे,' असं ट्वीट करत रंगोली चंडेल हिने अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, याआधीही रंगोली चंडेल हिने कोरोना व्हायरसची परिस्थिती हाताळण्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.