मुलुंड (उमेश यादव) : देशात चं नव्हें तर संपूर्ण जगातच या कोरोना विषाणूने विळखा घातला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून देश देखील लॉकडाउन मध्ये आहे. जनतेने देखील देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी दिलेले आदेश पाळण्याचे मनावर घेतलेले दिसून येत आहे. आपण घरात बसून आहोत परंतु आपलं सरकार हे आपल्याला वाचवण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करीत आहेत. मनुष्य म्हंटल की मरणाची भीती ही आलीच, परंतु तरी देखील आपण सर्व नागरिक या कोरोना व्हायरस ला बळी पडू नये यासाठी पोलीस प्रशासन, डॉक्टर्स, सफाई कामगार हे आपल्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा नं करता, आपल्या परिवारापासून दूर राहून रात्रंदिवस मेहनत करत आहेत.
त्यातच पोलीस प्रशासनावर आणि ट्रॅफिक पोलिसांवर जास्तच लोढ आला आहे. आपण 10 पैकी 9 जण तर घरात बसून आहोत परंतु त्यातील एक व्यक्ती हा नं ऐकणारा असतोच, तो व्यक्ती बाहेर कुठल्या नं कुठल्या कारणाने विनाकारण घराबाहेर पडतच असतो, असे विनाकारण व्यक्ती बाहेर पडू नयेत यासाठी आपले पोलीस बंधु आणि ट्रॅफिक पोलिस बंधू हे डोळ्यात तेल घालून पाहणी करत आहेत की गरज नसताना कोणीही रस्त्यावर दिसू नये याची काळजी आपल्यापेक्षा जास्त ते घेत आहेत. अश्या या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी काम करणाऱ्या बांधवाना भीमशक्ती वाहतूक सेनेचे प्रदेश अध्यक्ष श्री सिद्धार्थ मोकळ यांनी बिस्कीट वाटप केले आहे त्याच बरोबर आणखी कुठलीही आवश्यकता असल्यास आम्ही आपल्या मदतीला इथेच आहोत असे आश्वासन देखील दिले आहे.