मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना मुळे भारतात उद्दभवलेल्या गंभीर परिस्तितीचा विचार करुन तसेच मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी केलेल्या आवाहनास [प्रतिसाद म्हणून व एक सामाजिक बांधिलकी म्हणून दि महाराष्ट्र मंत्रालय अँड अलाइड ऑफिसेस को-ऑप बैंक लि. मुंबई या शासकीय कर्मचाऱ्यांच्या अग्रगण्य बँकेच्या संचालक मंडळाने मुख्यमंत्री सहायता निधी COVID - १९ या निधिस रुपये ५,००,०००/- इतकी मदत देण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.
सदर रुपये ५,००,०००/- रक्कमेचा धनादेश मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव यांना बँकेचे अध्यक्ष श्री. प्रमोद बा. पंडित व उपाध्यक्ष श्री. भारत वा. वानखेड़े यांनी सुपुर्द केला. या प्रसंगी बँकेच्या संचालिका सौ. पूजा भा. उदावंत, संचालक श्री. भगवान पां. पाटिल, श्री. समीर वि. तुळसकर व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दयानंद भा. महाजन आदि उपस्तित होते.