फेसबुक लाईव्हदरम्यान एका व्यक्तीने सैन्याला बोलावण्यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले की, "एकीकडे देश चिंतेत आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख वारंवार आवाहन करत आहेत. 90 टक्के लोक सूचनांचं पालन करत आहेत. पण 10 टक्के लोक अजूनही हे नियम पायदळी तुडवत आहेत. सैन्य बोलावणं ही अगदी शेवटची वेळ आहे. परकीयांविरोधात सैन्याला बोलावलं जातं, स्वकियांविरोधात नाही. आवश्यकता वाटली तर याबाबत निश्चितच विचार केला जाईल."
सैन्याला बोलावणं हा शेवटचा पर्याय - शरद पवार