मुलुंड (प्रतिनिधी) : देशामध्ये कोरोना वायरसने विळखा घातल्यायापासून देश लॉकडाउन मध्ये आहे. त्यातच सरकारने राशन मोफत मिळणार हे देखील जाहिर केले आहे. ज्या व्यक्तींकडे राशन कार्ड नाही आहे अश्या गरजू लोकांना देखील सरकार मोफत राशन देणार आहे. परन्तु अश्या या सलाखाच्या परिस्थिति मध्ये देखील लोकांमधली माणुसकी जिवंत असल्याच आणखी एक उदाहरण समोर आले आहे.
मुलुंड मधील एकता रिअल इस्टेट एजंट असोसिएशन गरीब लोकांसाठी सकाळी चहा आणि नाश्ता, दुपारचे जेवण, दुपारचे आरोग्य-पेय, संध्याकाळी चहा आणि रात्रीचे जेवण गेल्या कित्येक दिवसांपासून आयोजित करत आहेत. दररोज सुमारे ४०० लोकांना पुरेल इतके अन्न शिजविलेले जाते आणि ४०० गरजू व्यक्तींना वाटले देखील जाते. त्याचबरोबर ते स्वतः देखील हातामध्ये हैंड ग्लॉस आणि तोंडाला न विसरता मास्क लावून हे काम करीत आहेत. श्री ब्रह्मदेश्वर महादेव भक्त मंडळ हॉल, नाहूर रोड, गाला नगर जवळ, सौंदर्या हॉटेलच्या मागे, मुलुंड पश्चिम या ठिकाणी हे संपूर्ण जेवन आणि नाष्टा बनविला जात आहे.