मुलुंड (प्रतिनिधी) : देशाला कोरोना विशानुने विळखा घातलेला आहे, देश गेल्या २० दिवसांपासून लॉकडाउन मध्ये आहे, अश्यातच महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री सहायता निधि, COVID - 19 म्हणून महाराष्ट्र सरकारला स्वैछिने आपण मदत देत आहोत त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रा मध्ये कोरोना झालेल्या रुग्णाला कुठलीही अड़चन येऊ नये याकरिता...
कोणी १०१ रु. जमा करीत आहे, तर कोणी लाखो ने मदत देत आहे. यातच मुलुंड मधील संतोषी माता सांस्कृतीक कला मंडळ, एल. बी. एस. चा राजा सार्वजानिक गणपति मंडळ यांनी मुख्यमंत्री सहायता निधी COVID - 19 या खात्यामध्ये ६६६६/-रु. देऊन मदतीचा हाथ पुढे केला आहे.