नाशिक (प्रतिनिधी) : आज विश्वरत्न, परम पूज्य, बोधिसत्व, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती सम्पूर्ण राज्यातच नव्हे तर सर्या जगात साजरी होताना दिसत आहे. संपूर्ण जगाला कोरोना विशानुने विळखा घेतला आहे, म्हणून आपला देश है गेल्या २० दिवसांपासून लॉकडाउन मध्ये आहे.
आजचा दिवस म्हणजे आम्हा भारतीयांना एक सनच आहे. पण आज हा सन कुठल्याही चौकात किंवा मंडळामध्ये साजरा होताना नाही दिसत आहे, परंतु संपूर्ण भारतीय हे आज आपल्या घरामध्ये आपल्या संपूर्ण परिवारासोबत है दिवस साजरा करत आहेत.
त्यातच नाशिकचे मा. महापौर अशोक भाऊ दिवे यांनी आपल्या संपूर्ण परिवारासोबतच म्हणजेच आपला मुलगा स्थानिक नगरसेवक राहुल अशोक दिवे, मुलगा स्थानिक नगरसेवक प्रशांत दिवे आणि संपूर्ण परिवारासोबत घरातच राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२९ वी जयंती अतिशय आंनदाने आणि उत्साहाने साजरी केलि आहे.