पुणे (चाँद सय्यद) : भारत लॉकडाऊन असताना नको त्या कारणासाठी हजारो तरुण पाहिले असतील पण पिंपरी चिंचवडमध्ये दोन तरुणी चक्क बर्थडे साजरा करण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. वाकड पोलिसांनी त्यांना याबाबत जाब विचारला असता या तरुणींनी हुज्जत घातली. तरुणींची पोलिसांसोबतची भाषा ऐकून सर्वांनाच धक्का बसला. शेवटी गुन्हा दाखल करा असं महिला पोलीस अधिकारी म्हणाल्या असता तरुणींनी माफी मागण्याची भूमिका घेतली. याव्यतिरिक्त पोलिसांनी 54 दुचाकी ताब्यात घेत तरुणांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं.
बर्थडे सेलिब्रेशनसाठी बाहेर पडलेल्या तरुणींची पोलिसांसोबत हुज्जत