आमदार अनिल भोसले जेलमध्ये

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी बॅंकेचे संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अनिल भोसले हे जेलमध्ये आहेत. शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत 71 कोटी 78 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. शिवाजीराव सहकारी बॅंकेने नियमबाह्य पद्धतीने कर्जांचं वाटप केल्याचं आणि संचालकांच्या नातेवाईकांनाच कर्ज दिल्याचं उघड झाल्यावर, रिझर्व्ह बँकेने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासकाची नेमणूक केली होती. अनिल भोसले हे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे विधानपरिदषदेचे आमदार बनले होते. मात्र तीन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत घरोबा केला होता. अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले या भाजपच्या नगरसेविका आहेत. या घोटाळ्या प्रकरणी ज्या 11 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये रेश्मा भोसले यांचाही समावेश आहे.