माजी सैनिकाचा व्हेंटिलेटरचा अविष्कार; कोरोनाच्या लढाईसाठी मोफत तंत्रज्ञान

माजी सैनिक कॅप्टन रुस्तुम भरुचा यांनी व्हेंडिलेटरचं तंत्रज्ञान विकसीत केलं आहे. हे तंत्रज्ञान त्यांनी कोरोना रुग्णांसाठी मोफत देऊ केलंय.



पुणे (प्रतिनिधी) : माजी सैनिक कॅप्टन रुस्तुम भरुचा हे पुन्हा एकदा आपल्या देशवासीयांचं रक्षण करायला रणांगणात उतरले आहे. मात्र, यावेळी युद्धभुमी वेगळी आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी त्यांनी रुग्णांना लागणारे व्हेंटिलेटर्सची निर्मिती त्यांनी केली आहे. हा अविष्कार रुग्णांसाठी त्यांनी मोफत देऊ केला. मात्र, काही कंपनींनी त्याचा गैरफायदा घेत हे तंत्रज्ञान विकले. त्यावर कॅप्टन भरुचांना हे समजल्यानंतर त्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला. कॅप्टन भरुचांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत त्यांचं व्हेंटिलेटरच तंत्रज्ञान जगासाठी अगदी मोफत देऊ केलंय. अट एकच आहे ती म्हणजे त्या व्हेंटिलेटर्सवर त्यांचं नाव असण्याची.


कॅप्टन रुस्तुम भरुचा हे सैन्यात असताना भारतीय सैनिकांना युद्ध आघाडीवर आवश्यक ठरणारी यंत्र तयार करायचे. 1961आणि 1963 च्या युद्धांमध्ये त्यांना दमन आणि लडाखमध्ये तैनात करण्यात आलं होतं. निवृत्त झाल्यावर देखील कॅप्टन भरुचांनी अनेक यंत्रांची निर्मिती केली. कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात झाल्यानंतर कॅप्टन भरुचांनी बनवलेल्या व्हेंटिलेटरला जगभरातून मागणी येऊ लागली. इंग्लडडमधील किंग्ज कॉलेज, पुण्यातील आईसर संस्था आणि भारत फोर्ज कंपनिकडून भरुचांनी तयार केलेल्या व्हेंटिलेटरचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तशावेळी काही उद्योजकांनी कॅप्टन भरुचा यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा उठवत त्यांच्या व्हेंटिलेटरच तंत्रज्ञान परस्पर विकून त्यापासून पैसे कमावण्याचा प्रयत्न केला. कॅप्टन भरुचांना हे समजल्यानंतर त्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला. कॅप्टन भरुचांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत त्यांचं व्हेंटिलेटरच तंत्रज्ञान जगासाठी अगदी मोफत दिलं केलं आहे.