राज्याचा कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा वेग हा पूर्वी दोन दिवस होता तो नंतर साडेतीन झाला आता सध्या साडेपाच दिवस एवढा झाला आहे. हा दुपटीचा वेगाचा कालावधी जेवढा वाढेल तेवढी रुग्णसंख्या कमी होईल.
मुंबई (प्रतिनिधी): राज्यात कंटेनमेंट कृतीआराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याने कोरोना रुग्णांच्या दुप्पटीच्या दराचा वेग हा दोन दिवसांवरून साडेपाच दिवसांवर गेला आहे. हा कालावधी जेवढा वाढेल ती राज्याच्या दृष्टीने समाधानाची बाब असेल. राज्याचा कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा वेग हा पूर्वी दोन दिवस होता तो नंतर साडेतीन झाला आता सध्या साडेपाच दिवस एवढा झाला आहे. हा दुपटीचा वेगाचा कालावधी जेवढा वाढेल तेवढी रुग्णसंख्या कमी होईल.
राज्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर देशात जास्त आहे. त्यातील 83 टक्के मृत्यू हे रुग्णाला पुर्वीपासून जडलेल्या मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, मुत्रपिंडचा विकार यामुळे झाले आहेत.
कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्या मार्फत राज्यात उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णासाठ तातडीचा वैदयकीय सल्ला दिला जाईल. त्यासाठी समितीतील तज्ञांचे संपर्क क्रमांक राज्यभरातील रुग्णालयांना कळविण्यात आले आहेत.
राज्यात आतापर्यंत झालेल्या चाचण्यांपैकी निम्म्या चाचण्या ह्या मुंबईत करण्यात आल्या आहेत. पुल टेस्टींग, रॅपीड टेस्टींगसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (आयसीएमआर) परवानगी मागितली आहे.
'हाय रिस्क' गटातील व्यक्तींची वैद्यकीय चाचणी 7 दिवसांच्या विलगीकरणानंतर