Lockdownमुळे मिळाली नाही Ambulance, महिलेने पोलिसांच्या जीपमध्ये दिला मुलाला जन्म

तिच्या कुटुंबीयांनी Ambulanceसाठी प्रयत्न केले मात्र त्यांना Ambulance उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे मग त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला मदत मागितली.



नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे सगळा देश ठप्प आहे. अत्यावश्यक सेवा सोडून सगळी वाहतूक बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना फटका बसला आहे. राजधानी दिल्लीत एका गर्भवती महिलेला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी Ambulance मिळाली नाही त्यामुळे ती महिला पोलिसांच्या गाडीत हॉस्पिटलमध्ये निघाली होती. मात्र वाटेतच तिला प्रसववेदना सुरू झाल्या आणि ती बाळांत झाली. आई आणि मुलगा दोघेही सुखरूप आहेत.


दिल्लीतल्या रघुवीरनगरमधली ही घटना आहे. एका महिलेला नऊ महिने पूर्ण झाले होते. आता आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल याची तिला जाणीव झाली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी Ambulanceसाठी प्रयत्न केले मात्र त्यांना Ambulance उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे मग त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला मदत मागितली. पोलिसांनी एका महिला कॉन्स्टेबलला सोबत देत आपली गाडी महिलेला दिली.


महिला हॉस्पिटलजवळ येताच तिला कळा सुरू झाल्या आणि तिने मुलाला जन्म दिला. पोलिसांनी तातडीने हॉस्पिटलमधल्या नर्सला बोलावून घेतलं आणि तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती केलं. आता दोघांचीही प्रकृती उत्तम असून महिला आणि तिच्या कुटुंबीयांना पोलिसांचे आभार मानले आहेत.