भीमशक्ति माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार  यूनियनचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ मोकळ यांचि मुख्यमंत्र्यांकडे मागणी... 


मुंबई (प्रतिनिधि) : आजच्या घडीला संपूर्ण देशात व प्रत्येक राज्यात कोरोना (कोविड १९) विषानुची महामारी जोरात फैलावत आहे. आपण केलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्राच्या कोरोना विषाणुच्या संकटाचा सामना सगळी जनता करीत आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यात संचारबंदी, लॉकडाऊनसारखे चांगले निर्णय घेऊन कोरोना विषाणुचा, संसर्ग, प्रभाव व  प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक योजना अमलात आणल्या त्याचा आम्हाला सार्थ अभिमान व गर्व आहे. आपण करीत असलेल्या प्रयत्नांना लवकरात लवकर यश येवो व राज्यातील, देशातील जनता लवकरच कोरोना मुक्त होवो, यासागळ्या साठी आम्ही आपल्या सोबत आहोत अशी ग्वाही भीमशक्ति माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार यूनियनचे अध्यक्ष श्री सिद्धार्थ मोकल यांनी मुख़्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांना दिली त्याच बरोबर काही कळकळीच्या मागण्या देखील पत्राद्वारे मांडल्या आहेत. 


हे सर्व करत असताना आमचा कष्टकरी, हातावर पोट भरनारा रिक्षा चालक, टेम्पो चालक आणि रोज मजूरी करणारा कामगार त्यात चांगलांच हेरपळूण निघाला आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून या सगळ्यांची रोजी रोटी बंद झाली आहे. यांची रोजची परिस्थिति म्हणजे " रोज कमवेल तरच रोज खाईल "  अशी आहे. येणारा पुढील काळ किती दिवस व किती वेळ खाइल याचा कोणालाही अंदाज लावता येत नाही. त्यामुळे रोजनदारीवार काम करणारे हे सगळे हतबल झाले आहेत. त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. बिकट परिस्थिति निर्माण झाली आहे. या सगळ्यांच्या कुटुंबियांना काय करावे हे सूचत नाही आहे. या सगळ्या चालकांचे व कामगरांचे ४ ते ५ जनांचे कुटुंब आहे. त्यांची सध्या उपासमार होत आहे, आर्थिक कोंडी झाली आहे. आज सुरु असलेल्या परिस्थितीत या चालकांकडे व कामगारांकडे लक्ष द्यायला कोणालाही सवड नाही. मग सामान्य चालकांनी व कामगारांनी मदत कोणाकडे मागायची ? है प्रश्न निर्माण झाला आहे. समाधानाची एकच गोष्ठ म्हणजे कर्जाच्या हप्त्याची मुदत ३ महीने पुढे ढकलली. या सर्वाना नंतर त्याचेही टेंशन येणारच आहे. रोजचा दैनदिन खर्च, आजारपनात येणारा खर्च तो काही थांबत नाही, तो करने आवश्यकच आहे पण त्यासाठी त्यांच्याकडे आजच्या घडीला पैसे नाहीत. घरात कोणी अचानक आजारी पडला तर करायचे काय ? महाराष्ट्र सरकारने सर्व वर्गातील कष्टकरी जनतेला मदत जाहिर केली, परन्तु यामध्ये चालक आणि मजूरांचा उल्लेख कोठेही नाही. हा वर्ग दुर्लक्षित झाला याची माला खंत  वाटते, हा रिक्षा चालक, टेम्पो चालक आणि मजूरांवर एक प्रकारचा अन्यायच आहे असे माझे मत आहे 


मा. मुख्यमंत्री महोदयांना माझी कळकळीची विनंती आहे की, कोरोना विषानुने सर्वत्र हाहाकार उडवलेला असल्याने जो पर्यंत हे संकट टळत नाही तोपर्यंत सर्व रिक्षा चालकांना, टेम्पो चालकांना, रोजनदारी कामगारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत तातडीने जाहिर करावी, आपण या प्रकरणी जरुर विचार करुन निर्णय घ्याल याची मला खात्री आहे, नाहीतर राज्यातील रिक्षा चालकांवर , टेम्पो चालकांवर, रोजनदारी करणाऱ्या कामगारांवर शेतकऱ्यांसारखी आत्महत्या करायची वेळ येईल. महाराष्ट्र सरकारने आमच्या विनंतिची तातडीने दखल घ्यावी अशी विनंती देखील भीमशक्ति माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार यूनियनचे अध्यक्ष श्री सिद्धार्थ मोकळ यांनी केलि आहे.