ठाणे (दीपक जाधव) : देशामध्ये कोरोना वायरसने विळखा घातल्यायापासून देश लॉकडाउन मध्ये आहे. त्यातच सरकारने राशन मोफत मिळणार हे देखील जाहिर केले आहे. ज्या व्यक्तींकडे राशन कार्ड नाही आहे अश्या गरजू लोकांना देखील सरकार मोफत राशन देणार आहे. परन्तु अश्या या सलाखाच्या परिस्थिति मध्ये देखील लोकांमधली माणुसकी जिवंत असल्याच आणखी एक उदाहरण समोर आले आहे.
आज देशाची परिस्तिथी खूपच हलाकिची असताना फुटपाथ वर व रोडवर बरिच गरीब लोक उपाशी पोटी आहेत लॉकडाउन असल्या मुळे तिथे कोणीही जात नाही अशा परिस्तिथी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी सिद्धार्थ नगर ठाणे, पूर्व यांच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून नास्ता देण्यात येत आहे. त्या प्रसंगी कमेटी चे अध्यक्ष मिलिंद अहिरे, सल्लागार दीपक जाधव, कमेटी सदस्य जयेश बनसोडे, पप्पू जंगम, प्रफुल भालेराव, प्रदीप सरोदे आदि उपस्तित होते.