वडूज (चाँद सय्यद) : मु. पो. वडूज, ता. खटाव येथील तसीलदार सौ. अर्चना पाटिल यांनी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. वडूज मधील समस्त नागरिकांना प्रशासनाच्या वतीने, पोलीस प्रशासनाच्या वतीने, वाहतूक प्रशासनाच्या वतीने, नगरपालिका प्रशासनाच्या वतीने अश्या सर्वांच्या वतीने त्यांनी आवाहन केले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढताना दिसत आहे. आपल्या बॉड्री वर जे रुग्ण सापडले आहेत, त्यांना देखील उपचारासाठी ताब्यात घेतलेले आहे. आपला जिल्हा देखील रेड झोन घोषित केलेला आहे, यापुढे कोणावरही दयामाया केली जाणार नाही, कायद्यातून कोणीही वाचू शकत नाही, सगळ्यांनसाठी नियम सारखे राहतील. तेव्हा उद्यापासून कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. आपला तालुका निरोगी ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करा असे आवाहन तहसिलदार यांनी केलेले आहे.
सुरक्षित रहा, आणि गर्दी टाळा. जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला घेण्यासाठी घराबाहेर निघताना वाहन घेऊन निघू नये, एकटेच आणि पायीपायी निघावे असे अन्यथा कारवाई केली जाईल, कोणाचेही फोन आले तरी कारवाई होणारच आहे याची काळजी घेण्यात यावी असे देखील त्यांनी सांगितले आहे. वेळोवेळी प्रशासन तुम्हाला सूचना देत आहे. भाजी देण्यासाठी भाजी विक्रेते हे तुमच्या दारात येत आहेत, विनाकारण भाजी मांडइमध्ये गर्दी करू नका अन्यथा जेवढा वेळ तुम्हाला दिला गेला आहे त्यावर देखील निर्बंध हे तुमच्या चुकीमुळे लादले जातील.
प्रशासन हे तुमचे आरोग्य सुखरुप राहावे आणि तुम्ही निरोगी राहावेत यासाठी हे सगळे प्रयत्न करीत आहेत, इतक्या सक्तीने वागत आहेत, गरज आहे ती फक्त तुमच्या सहकार्याची अन्यथा आम्हाला कडक कारवाई करण्याव्यतिरिक्त पर्याय नाही आहे.