‘लॉकडाऊन संपल्यानंतर मुंबईत होऊ शकतात कोरोनाचे 50,000 रुग्ण’

मात्र 3 मेनंतर जर लॉकडाऊन हटविण्यात आलं तर पुन्हा सगळे कामावर परत जातील आणि कोरोनाचा झपाट्याने प्रसार होईल.



मुंबई (प्रतिनिधी): कोरनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात देशातले सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यात मुंबई हॉटस्पॉट ठरलं आहे. लॉकडाऊनमुळे सगळे आता घरात बंद आहेत. त्यामुळे कोरोनाला रोखण्यात काही प्रमाणात यशही आलं आहे. पण लॉकडाऊन संपल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. एकट्या मुंबईतच कोरोनाचे 50 हजार रुग्ण होतील अशी भीती राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केली आहे.


सध्या लॉकडाऊन आहे सर्वत्र शांतता आहे. मात्र 3 मेनंतर जर लॉकडाऊन हटविण्यात आलं तर पुन्हा सगळे कामावर परत जातील आणि ही संख्या वाढू शकते. त्यामुळे जास्तीत जास्त टेस्ट करून रुग्णांना आयसोलेट करा आणि उपचार करा असा सल्लाही दिला जात आहे.


कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहे. आज राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली असून संख्याही तब्बल  4483 वर पोहोचली आहे.


राज्यात आज सकाळी 11 पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या समोर आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. लवकरच हा आकडा 5000 पार करेल अशी भीती आहे.  सकाळपर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात  283 रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई पालिकेच्या हद्दीतील आहे. मुंबईत 187 रुग्ण आढळले आहे