महाराष्ट्रासह अनेक राज्यात लॉकडाऊनचं उल्लघन होत असल्याच्या तक्रारी केंद्राकडे गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील मुंबई, पुण्यात केंद्राचं पथक तपासणीसाठी येणार आहे.
नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र, अनेक राज्यात या लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लघन होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने मंत्रीगटाची (inter ministerial) स्थापना केली आहे. सहा मंत्रीगट असून हे पथक देशातील चार राज्यातील महत्वाच्या शहरात भेट देणार आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यात केंद्राचे हे पथक भेट देणार आहे. राज्यात पुणे आणि मुंबई येथील परिस्थिती गंभीर असल्याचे निरिक्षण केंद्र सरकारने नोंदवले आहे. त्यामुळे राज्यात या शहरांना हे पथक भेट देणार आहे.
केंद्र सरकारने लॉकडाऊन दरम्यान दिलेल्या नियमांचे उल्लंघन राज्यात झाल्याच्या तक्रारीचा आढावा हे पथक घेणार आहे. ह्यात अत्यावश्यक सेवा मिळत आहे की नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत आहे का? आरोग्याच्या योग्य सोयी-सुविधा आहेत का? आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांची परिस्थिती आणि राज्यात मजूर आणि गरिबांसाठी काय व्यवस्था केली याच आढावा हे केंद्रीय पथक घेणार आहे. महाराष्ट्रप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये इंदोर, राजस्थानमध्ये जयपूर तर पश्चिम बंगालमध्ये कोलकाता, दार्जिलिंग, जलपैगुडी, हावडा अशा शहरात हे केंद्रीय पथक जाणार आहे. विशेष म्हणजे या चार राज्यपैकी फक्त मध्य प्रदेश मध्येच भाजप शासित राज्य सरकार आहे.
मुंबईतील पथकात कोण असणार?
मनोज जोशी, (अतिरिक्त सचिव, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय), डॉ. एस. डी. खापर्डे, डॉ. नागेश कुमार सिंग, अभय कुमार, अनुराग राणा, अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
पुण्यातील पथकात कोण असणार?
संजय मल्होत्रा, डॉ. पी. के. सेन, डॉ. पवन, कुमार सिंग, डॉ. अविनाश गवई, करमवीर सिंग, हे अधिकारी पुण्याच्या टीममध्ये असणार आहेत.