कोरोना संदर्भात पुण्यातून पहिल्यांदाच आनंदाची बातमी...

पुणे (चाँद सय्यद) : पिंपरी चिंचवडमधील आणखी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची पहिली टेस्ट ही निगेटिव्ह आलेली आहे. आता त्याचे दुसरे नमुने आजच पाठवले जातायेत. हा रुग्ण फिलिपिन्स येथून आलेला असून 18 मार्चला त्याला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. शहरातील एकूण 12 रुग्णांपैकी 10 रुग्ण आधीच कोरोनामुक्त होऊन घरी परतलेत. उद्या या रुग्णांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्यास त्याला ही डिस्चार्ज दिला जाईल. उर्वरित एका रुग्णाची प्रकृती ही स्थिर आहे. तसेच 19 मार्च पासून शहरात एक ही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही