शाहिद-सैफसोबत लिफ्टमध्ये अडकलीस तर काय करशील... करिनानं दिलं धम्माल उत्तर

करिना-शाहिद बरीच वर्षं एकमेकांसोबत रिलेशिनशिपमध्ये होते. पण या दोघांचं ब्रेकअप झालं आणि करिनानं सैफशी लग्न केलं



मुंबई (प्रतिनिधी): अभिनेत्री करिना कपूर खान तिच्या अभिनयासोबतच हजरजबाबीपणासाठी ओळखली जाते. सिनेइंडस्ट्रीमध्ये सर्वांनाच माहित आहे की करिनाला एखादा कठिण प्रश्न विचारुन तिला मात देणं तेवढसं सोपं नाही. अनेकदा बऱ्याच मुलाखतींमध्ये करिना तिच्या धमाकेदार उत्तरांमुळे चर्चेत राहिली आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर डेब्यू करणाऱ्या करिनाला तिच्या आसपास घडणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती असते.


एका मुलाखतीत करिनाला फसवण्याच्या उद्देशानं असाच एक प्रश्न विचारण्यात आला होता मात्र या प्रश्नाचं धमाकेदार उत्तर देत करिनानं सर्वांची मनं जिंकली. एका मुलाखतीत तिला, 'जर तू सैफ आणि शाहिदसोबत एकाच लिफ्टमध्ये अडकलीस तर काय होईल?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न विचारणाऱ्याला वाटलं की करिना हा प्रश्न टाळेल पण असं झालं नाही. करिनाननं या प्रश्नाचं धम्माल उत्तर देत सर्वांची बोलती बंद केली.


शाहिद कपूर आणि सैफ आली खाननं रंगून सिनेमात एकत्र काम केलं होतं. तर करिना आणि शाहिदनं सुद्धा उडता पंजाब सिनेमात एकत्र काम केलं. या सिनेमाच्या प्रमोशनमध्येही दोघं एकत्र दिसले. दरम्यान एका मुलाखतीत करिनाला असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर करिना म्हणाली, 'असं झालं तर खरंच मज्जा येईल. मला तर कधी कधी प्रश्न पडतो की रंगूनमध्ये मला का कास्ट केलं गेलं नाही.'



करिना आणि शाहिद बरीच वर्षं एकमेकांसोबत रिलेशिनशिपमध्ये होते. 2007 मध्ये या दोघांचं ब्रेकअप झालं. मात्र त्याच वेळी रिलीज झालेला त्यांच्या 'जब वी मेट' हा सिनेमा खूप गाजला. पण यानंतर शाहिद-करिनाननं एकमेकांबद्दल बोलणं टाळलं. त्यानंतर करिना आणि सैफ एकमेकांना भेटले. अखेर या दोघांनी लग्न केलं. सैफ-करिनाच्या लग्नानंतर शाहिदनं सुद्धा मीरा राजपूतसोबत लग्न केलं. आता या दोघांना मीशा आणि झेन अशी दोन मुलं आहेत. तर करिना-सैफ यांचा तैमुर तर लहानपणापासूनच पॅपराझीमध्ये प्रसिद्ध आहे.