पी.एल. लोखंडे मार्ग, चेंबूर या ठिकाणी सॅनीटायझर फवारणी करण्यात आली.

चेंबूर (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी मुंबई महानपालिका मधील चेंबूर या ठिकाणी एकाच दिवशी जास्त प्रमाणात रुग्न हे कोरोना पॉज़िटिव्ह सापडले होते, त्यामुळे या ठिकाणी अतिशय चिंताजनक परिस्थिति ही निर्माण झाली होती. परंतु माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांतजी हंडोरे आणि वार्ड क्रमांक १५०. मधील स्थानिक नगरसेविका सौ. संगीता चंद्रकांत हंडोरे यानि सम्पूर्ण पी.एल. लोखंडे मार्ग वासियांना विनंती केलि आहे की घराबाहेर न पडण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा बाकि, काळजी घेण्यासाठी आम्ही आणि महानगरपालिका सक्षम आहोत. 



रुग्णांचे प्रमाण वाढू नये यासाठी त्यावर उपाययोजना म्हणून मा. सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि स्थानिक नगरसेविका सौ. संगीता चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेषानुसार पी.एल. लोखंडे मार्ग व पी. वाय. थोरात मार्गावरील मुख्य रस्त्यांवर सॅनीटायझर फवारणी करण्यात आली.