महाराष्ट्रात तरी 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन वाढवणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र काही राज्यांतील मुख्यमंत्री यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईसह काही शहरात परिस्थिती अद्याप नियंत्रणात आली नसल्याने महाराष्ट्रात तरी 14 एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढवणार असल्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्राने नेहमीच देशाचे नेतृत्व केलं आहे. या कोरोना संकटातही महाराष्ट्र ठाम उभा राहून जगाचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. या संकटामध्ये सर्व राज्ये देशाच्या पाठीशी उभा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सर्व राज्यांना योग्य त्या सूचना देत आहेत. यात राजकारण आणू नये ही विनंती आहे. राजकारण आपण आयुष्यभर करत आलो. मात्र, राजकारण करण्याची ही वेळ नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
आजच्या या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांना संबोधित करण्याची शक्यता आहे. हे लॉकडाऊन नसून लोकइन असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. उद्याच्या उज्वल भारतासाठी माणसांचा जीव सर्वकाही आहे. त्यामुळे लॉकडाऊन कायम राहणार आहे. या काळात सर्व बॉर्डर बंद राहतील. जे कामगार अडकले आहेत, तेही राज्य सोडून जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण देशात कोरोनाबाबत एकच भूमिका राहणार असल्याचंही ते म्हणाले. आता लॉकडाऊन काढले तर जे मिळवले ते सर्व जाईल, असे ट्विट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढणार असल्याचं त्यांनी सांगितले. येत्या 14 एप्रिलला देशातील लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, काही राज्यांनी हे लॉकडाऊन वाढण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.