मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वाधिक रुग्णांची संख्याही एकट्या मुंबईत आढळली आहे. वरळी, धारावी, कोळीवाडा हे कोरोनाचे व्हॉटस्पॉट ठरले आहे. कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे पालिकेच्या आरोग्य प्रशासनाने तातडीने पावलं उचलली. आज आरोग्य प्रशासनाच्या कसोटीचा दिवस आहे. धारावीबद्दल महत्त्वाचा रिपोर्ट येणार आहे.
एकेकाळी आशिया खंडात सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावी उदयास आली. पण, आज धारावीचं रूप बदलून गेलं आहे. कोरोनाच्या तडाख्यात धारावी सापडल्यामुळे राज्य सरकारसह पालिका प्रशासनासाठी हे सर्वात मोठे आव्हान ठरले आहे. दाटीवाटीच्या या वस्तीत कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा सर्वात जास्त धोका आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने तातडीने पावलं उचलली.
धारावीतील जवळपास पंधरा हजार लोकांची स्क्रीनिंग केली म्हणजे तपासणी केली गेली आहे. या 15 हजारातून 90 लोकांचे नमुने घेण्यात आले. त्याच्यामध्ये सर्दी ताप खोकला अशी लक्षणं आढळून आलेले आहेत. अशा 90 लोकांचे आज तपासणी अहवाल येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या 90 जणांपैकी 50 ते 60 जण जर पॉझिटिव्ह झाले तर धारावीमध्ये कम्युनिटी स्प्रेड अर्थात समूह संसर्ग झाला असं म्हणू शकतो. जर असा अहवाल आला नाहीतर ही आरोग्य प्रशासनासाठी ही दिलासादायक बाब ठरले. आणि त्यानंतर धारावीमध्ये कोरोना व्हायरस कंट्रोल करण्यात आला असे म्हणता येऊ शकेल.
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 2334 वर
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे (Covid - 19) 100 जणांचा मृत्यू झाल्याची बाब आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 352 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.