जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 21 लाख पार; तर मृतांचा आकडा 1.45 लाख पार

कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. अशातच जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे.



नवी दिल्ली : जगभरातील कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या आणि मृतांच्या आखड्यात झपाट्याने वाढ होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगभरात 21 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर मृतांचा आकडा 1.45 लाखांवर पोहोचला आहे. तर संपूर्ण जगात 5 लाखांहून अधिक लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


24 तासांमध्ये सर्वाधिक संसर्ग झालेले देश




































देशएकूण कोरोनाग्रस्तनवीन कोरोनाग्रस्त
अमेरिका677,056+29,053
फ्रान्स165,027+17,164
टर्की74,193+4,801
ब्रिटन103,093+4,617
स्पेन184,948+4,289


24 तासांमध्ये सर्वाधिक मृत्यू झालेले देश




































देशएकूण मृत्यूगेल्या 24 तासांत मृत्यू
अमेरिका34,580+2,137
ब्रिटन13,729+861
फ्रान्स17,920+753
इटली22,170+525
स्पेन19,315+503


जाणून घ्या 24 तासांत कोरोनाने जगभरात काय बदललं?


जगभरात कोरोना व्हायरसमुळे दररोज नवीन बदल पाहायला मिळत आहेत. अमेरिकेमध्ये उद्या न्यूयॉर्कमध्ये 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. न्यूयॉर्कच्या गव्हर्नरांनी याबाबत माहिती दिली. याआधी त्यांनी न्यूयॉर्क शहरामध्ये सर्वांना मास्त घालणं अनिर्वाय असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, न्यूयॉर्क शहर अमेरिकेतील कोरोनाचं केंद्र बनलं आहे.


याव्यतिरिक्त ब्रिटनमध्ये लॉकडाऊन 3 आठवड्यांनी वाढवला आहे. ब्रिटनचे विदेश सचिव डॉमनिक राब यांनी याबाबत डाउनिंग स्ट्रीट येथून घोषणा केली. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाले असून ते सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आराम करत आहेत. त्यामुळे डॉमनिक राब यांनी यासंदर्भात घोषणा केली. तसेच यासंदर्भात बोलताना त्यांनी, कोरोनाला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी लॉकडाऊन वाढवणं अत्यंत आवश्यक असल्याचं सांगितलं.


ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी तेथील आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकलं. दोघांमध्ये कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी घालण्यात आलेल्या नियमावलीवरून मतभेद निर्माण झाले होते. दरम्यान राष्ट्रपती जायर बोल्सोनारो आणि आरोग्यमंत्री लुईज हेनरिक मॅन्डेटा यांच्यातील मतभेद सार्वजनिक रित्याही पाहायला मिळाले होते. ब्राझीलचे आरोग्यमंत्री सतत सोशल डिस्टंन्सिंग आणि आयसोलेशन महत्त्वाचं असल्याचे सांगत होते. तर राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी ब्राझीलची अर्थव्यवस्था जास्त महत्त्वाची असल्याचं सांगितलं.