लॉकडाऊनमुळे राज्यात बंद असलेली कापूस खरेदी 20 एप्रिलनंतर सुरू होणार आहे. ऑनलाईन बुकिंग आणि फोनवर बुकिंग करूनही कापूस खरेदी करणार असल्याची माहिती सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
मुंबई (प्रतिनिधी): कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना सरकारने काहीसा दिलासा दिला आहे. कोरोना, लॉकडाऊनमुळे राज्यात बंद असलेली कापूस खरेदी 20 एप्रिलनंतर सुरू होणार आहे. ऑनलाईन बुकिंग आणि फोनवर बुकिंग करूनही कापूस खरेदी करणार असल्याची माहिती राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
यासंदर्भात मुंबईत आज बैठक पार पडली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कापूस खरेदीला सुरुवात करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ऑनलाईन बुकिंग आणि फोनवर बुकिंग करूनही कापूस खरेदी करणार असून बुकिंगनुसार शेतकर्यांना केंद्रावर येण्याचा दिवस आणि वेळ कळवला जाईल अशी माहिती बाळासाहेब पाटील यांनी दिली.