पुणे (प्रतिनिधी) : मशिदीत नमाज पठण करणाऱ्या 17 तबलिगीविरोधात पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, गुरुवारी फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत रविवार पेठेतील मशिदीत नमाज आवाज ऐकू आल्यावर पोलिसांनी जाऊन कारवाई केली. हे सर्वजण तबलिगी जमातीचे बिहार व झारखंडचे रहिवासी आहेत. पुण्यात फेब्रुवारीमध्ये मशिदीचे काम करण्यासाठी आले होते.नंतर गावी जाणार होते.मात्र मशिदीने यांची माहिती का लपवली? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान या सर्वांची कोरोना तपासणी करण्यात आली. यांचं दिल्ली कनेक्शन नसल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.
17 तबलिगीविरोधात पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल