तुमचे आरोग्य हे आमच्यासाठी मोलाचे आहे...अशी विनंती करुन वडुजातील जनतेवर कडक कारवाईचे आदेश : पोलिस अधीक्षक - महामुनि



वडुज (अक्षय लोहार) : राज्यात लॉकडाउन गेल्या ३० दिवसांपासून सुरु आहे. आपल्याला आपल्या आवश्यक आणि मुलभुत गरजा भागविण्याकरीता सकाळी  ९ ते  दुपारी २ ही वेळ देण्यात आली आहे. तेव्हा सकाळी ९ ते दुपारी २ ही वेळ आपल्यासाठी मोकळीक आहे, असा गैरसमज जनतेच होउ  नए यासाठी पोलिस अधिक्षक श्री महामुनि यांनी स्वता जनतेस आणि सहपोलिस कर्मचारी यांना योग्य ते मार्गदर्शन केले आहे. 


उद्यापासून खटाव तालुक्यातील सर्व महत्वाचे चौक  हे बनाकबंदी करुन सील करण्यात येनार आहेत. सह पोलिस कर्मचाऱ्यांना आणि त्याच बरोबर जनतेला सांगण्यात आले आहे की, उद्यापासून अतिशय कडक लॉकडाउन हा पळला जावा. उद्यापासून कुठल्याही नाक्यावर किंवा गल्लीबोळात जरी कोणी फिरताना दिसल तरी करवाई ही १००% होणार आहे. डॉक्टरांकडे चाललो आहे,ओषध आनन्यास चललो आहे असे खोटे  सांगून बाहेर पडने हे आता महाग  पडणार आहे. आतापर्यन्त ४५० गाड्या  या जप्त करण्यात आलेल्या आहेत. आता देखील आशिच किंबहुना यापेक्षा ही  कडक करवाई ही करण्यात येईल, समोरील व्यक्ति ही कोणीही असो, कोणाचा फोन असो  कायदा सगळ्यांसाठी सारखाच पाळला जाणार आहे, याची खबरदारी देखील पोलिस प्रशासन हे घेणार आहे. दुकानदार आणि भाजी मंडइवाल्यानं देखील सुचनेमधे कही बदल असल्यास वेळोवेळी सूचना दिल्या जातील. दुकानदारनि  देखिल दिलेल्या वेळेतच दुकान चालू ठेवावित अन्यथा त्यांच्यावर देखील कड़क करवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


दवाखान्यातिल  कर्मचारी, बाँकेतील कर्मचारी असे जे अत्यावश्यक सेवेतील कामगार घराबाहेर कामासाठी पडत आहेत त्यांनी देखील एकट्याणेच घराबाहेर पडावे सोबत कोणी असल्यास त्यांच्यावर देखील कड़क करवाई करण्यात येईल ऐसे सख्त आदेश हे देण्यात आले आहेत. 


तुमचे आरोग्य हे आमच्यासाठी मोलाचे आहे, तेव्हा सर्व वडुजकरांनी आदेश पाळावेत , गर्दी टाळा, सुरक्षित रहा आम्हाला कारवाई करण्यास भाग पाडू  नका अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.