छेड काढल्याप्रकरणी तीन रोडरामिआना अटक

डोंबीवली (प्रतिनीधी ) : सोमवारी हातात राक्षी बांधून घेतलेल्या भावांनी बहिणीच्या रक्षणाची हमी दिल्याचा रक्षाबंधन सण सर्वत्र उत्साहात साजरा झाला. तर दुस-याच दिवशी बहिणीच्या रक्षणसाठी सरसावलेल्या भावावर गावगुंडांकडून हल्ला झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली. रोडरामिओने छेड काढल्यानंतर घाबरलेल्या या मुलीने हा प्रकार आपल्या भावाला सांगितला. भावाने रोडरोमियोला जाब विचारुनथेट कॉलेजमधील शिक्षकांकडे तक्रार केली असता संतापलेल्या रोडरामियोंनी तिच्या भावाला झोडपले. मात्र गुन्हा दाखल होताच कोळशेवाडी पोलिसांनी तिघा सडकछापांच्या मुसक्या आवळून गजाआड केले. कल्याण पूर्वेकडील काटेमनिवली परिसरात राहणारी १७ वर्षीय मुलगी याच परिसरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेते. याच कॉलेजमधील काही तरुण गेल्या काही दिवसांपासून तिला छेडत होते. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही विद्यार्थिनी कॉलेजमध्ये जात असताना कॉलेजच्या गेटबाहेर भिवंडीत थांबलेल्या चार-पाच जणांच्या टोळक्याने पुन्हा जिची छेड काढली. त्यावेळी हा प्रकार घडला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी वैभव म्हात्रे, हितेश म्हात्रे. अभिषेक मिश्रा या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना कल्याण कोर्टात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.