जळगाव (प्रतिनिधि): जगभर धुमाकूळ घालणाऱ्या करोना विषाणूनं जळगावातही शिरकाव केला आहे. शहरातील मेहरूण भागात राहणाऱ्या एका ४९ वर्षीय रुग्णाचा करोना तपासणीचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळं खबरदारी म्हणून प्रशासनानं शनिवारी रात्रीपासून मेहरूण परिसर सील केला आहे. करोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या नातेवाइकांसह तब्बल ४० जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. गेले दहा दिवस हा रुग्ण अनेकांच्या संपर्कात आल्याने रुग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे.
जळगावातही करोनाचा शिरकाव; आढळला पहिला रुग्ण