नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणा-या कोरोनामुळे आतापर्यंत २७,३७० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ५,९७,४५८ लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे, तर १,३३,३७३ लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग होणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. इटलीत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. इटलीत ९१३४ लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. चीनमध्ये ३२९५, अमेरिकेत १७०४, स्पेनमध्ये ५१३८, इराणमध्ये २३७८, फ्रान्समध्ये १९९५, जर्मनीमध्ये ३९१ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही ७०० हून अधिक झाली आहे.