भारतात अडकलेल्या सर्व नागरिकांना ‘एअर लिफ्ट’ करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. यासाठी अमेरिकेकडून तयारी सुरु करण्यात आला आहे. भारतात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने अमेरिकेतील जवळपास दोन हजाराहून जास्त नागरिक अडकले आहेत.
अमेरिकन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारतात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने तसेच अनेक विमाने रद्द करण्यात आल्याने तिथे अडकलेल्या दोन हजार नागरिकांना एअर लिफ्ट करण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. यामधील दीड हजार अमेरिकन नागरिक नवी दिल्लीत आहेत, तर मुंबईत ६०० ते ७०० जण अडकले आहेत. याशिवाय ३०० ते ४०० नागरिक इतर ठिकाणी अडकल्याची भीती असून त्यांना त्यांची ओळख पटवून देण्यास सांगण्यात आले आहे.