सांगली (चाँद सय्यद) : राज्य सरकारने घोषित केलेली मिरजेतील कोरोना तपासणी लॅब आठ दिवसात सुरू होणार आहे. सांगलीतील जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. या लॅबमुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाच्या तपासण्या करण्यासाठी मदत होणार आहे. याचबरोबर इस्लामपूरच्या त्या 24 पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृतीची स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेचआपली काळजी घ्यावी असे आवाहनही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं आहे. ही लॅब सुरू झाल्यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या परिसरातील संशयित रुग्णांच्या सॅम्पल्स तपासणीला गती मिळणार आहे. सध्या या संपूर्ण परिसरातील संशयितांचे संपल्स पुण्याला पाठवावे लागतात, त्याचे रिपोर्ट यायला किमान दोन दिवस लागतात त्यामुळे संशयित रुग्णांना विनाकारण ऍडमिट करून घ्यावे लागते, ही लॅब सुरू झाल्यामुळे संशयित दाखल रुग्णाची तातडीने तपासणी होऊन त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर त्यांना सोडून देता येणार आहे.
राज्य सरकारने घोषित केलेली मिरजेतील कोरोना तपासणी लॅब आठ दिवसात सुरू होणार आहे