अंजनी पर्वतावर अनवाणी चालत येइन..असे साकड़ आपल्या बजरंगबली बाप्पाला...गुरुवर्य प्रकाशभाऊ शिंदे

पुणे (प्रतिनिधी) : आपला महाराष्ट्र हा संतांची भूमि म्हणून ओळखला जातो, तर आपन ज्या देशामध्ये राहतो आहे त्या देशामध्ये ३३ कोटि देवांची पूजा ही भारतीय लोक करतात. आज देशलाच नाहीतर सपूर्ण जगाला या कोरोना वायरस ने विळखा घालून जग धोक्यामध्ये आनले आहे. 



आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण सगळे सन हे देवाची पूजा केल्याशिवाय साजरे करत नाही. कोणी मंदिरामध्ये जाउन देवाची पूजा करतात तर कोणी मनातल्या मानत करतात.  त्यातच पुण्यातील गुरुवर्य श्री प्रकाश भाऊ शिंदे हे बजरंग बलीचे कट्टर भक्त आहेत. त्यांचे म्हणणे असे आहे की काही लोक म्हणतात आज देव देखील दार बंद करून बसले आहेत, परन्तु त्याना मनापासून अस वाटत आहे की मरणाची भीति कोणाला नाहि आहे. मानवी शरीर म्हटल की मरणाची भीति ही आलीच, आज डॉक्टरांना मरणाची भीति नसेल का ? 


आज आपण डॉक्टर ला देव म्हणत आहोत याचाच अर्थ असा की, जे देऊळ बंद आहे, जे चर्च बंद आहे, जी मस्जिद बंद आहेत या सर्व ठिकानाचे  देव हे मानसातल्या रुपात कुठे दवाखान्यामध्ये कोणाचा जिव जाऊ नये याची काळजी घेत आहे, कुठे कोणीही घराच्या बाहेर विनाकारण निघू नए यासाठी पोलिसांच्या रुपात सर्वांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत आहे, तर आपला परिसर आणि आजूबाजूचे परिसर स्वच्छ करण्यासाठी स्वछता कामगारच्या रूपात काम करीत आहे. 



अश्या या परिस्थितीमध्ये राज्याचच नव्हे तर जगाच संकट दूर व्हाव आणि हे जग कोरोना मुक्त व्हाव यासाठी गुरुवर्य श्री प्रकाश भाऊ शिंदे यानी आपल्या लाडक्या अश्या जागृत देवाला म्हणजेच बजरंगबली बाप्पाला कळकळीची विनती केलि आहे  की माझी ही इच्छा पूर्ण कर बाप्पा मि तुझ्या दर्शनला अंजनी पर्वतावर अनवाणी चालत येइन 


आजही बाप्पा वर लोकांचा  विश्वास तेवढाच आहे हे गुरुवर्य श्री प्रकाशभाऊ शिंदे यानि सिद्ध केल आहे.