__ माणसाची आरांग्यसंपदा चांगली रहावयास हवी असेल तर त्याला किमान सहा तास झोप मिळणे आवश्यक आहे. ज्यावेळी तंत्रज्ञान घराघरांत पोहोचले नव्हते तेव्हा सातच्या आत घरात आणि दहाच्या आत अंथरुणात अशी परिस्थीती होती. दहा वाजता झोपलेला माणूस सकाळी पाच वाजता प्रसन्न मनाने उठायचा. मात्र, आता संगळ्यांचीच झोप हरवली आहे. तरुणाई तर झोप विसरून गेली आहे असे म्हणण्याइतपत जागत असते. झोपेचे सोंग घेता येते परंतु, पैशाचे सोंग करता येत नाही अशी एक म्हण आहे. म्हणजेच प्रत्यक्ष झोप लागली नसतानाही झोप लागत असल्याचे चित्र निर्माण करता येते. मात्र पैशाच्या बाबातीत तसे होत नाहीपैसे नसले तर पैसे असल्याचे सोंग अजिबात जमत नाही किंवा पैसे असूनही पैसे नसल्याचे ढोंगही करता येत नाही. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी तसा थेट संबंध नसला तरी अप्रत्यक्ष बराच संबंध येतो. मग झोपेचे सोंग असो किंवा पैशाचे पैसा कमवायचा असेल तर परोशी झोप आवश्यक असते. पुरेसा पैसा मिळवायचा असेल तरीसुध्दा तितक्याच झोपेची आवश्यकता असते.आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पसा मिळवण साप झाल आह. पण झोप मिळणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. आज संपूर्ण जगात निद्रानाश हा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येते. तसेच आजचे तरुण पेसबूक आणि व्हॉट्सअॅपमुळे आपली चार ते पाच तासांची झोप गमवीत आहे. झो कमी ५ते ३० वयोगटांतल्या तरुणांमध्ये हृदयविकारोचे सर्वाधिक प्रमाण पहायला मिळते. आजच्या धावपळीच्या, धकधकीच्या जीवनामध्ये एकूणच मन किंवा शरीरस्वास्थ टिकविण्याकरिता ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्यात आर्थिक स्थिरता हा भाग महत्वाचा आहे. तरीदेखील विपरीत परिस्थितीतही मनाचे संतुलन कायम ठेवावे लागते आणि हे मनाचे संतुलन अन्य प्रकाराच्या चिंता बाजूला ठेवून पुरेशा झोपतून प्राप्त करात शकते. दुर्देवाने यातला गंभीर स्वरुपाचा विरोधाभास असा आहे शरीर किंवा मन:स्वास्थ टिकविण्यासाठी फेसबूक, व्हॉट्सअॅप किंवा इंटरनेटचा मर्यादित वापर व्हायला पाहिले. पण माध्यमामुळेच मन:स्वास्थ बिघडण्याच्या तक्रारी वाढलेल्या दिसून येतात. जगाच्या कोणत्याही घटना काही क्षणात इंटरनेट, व्हॉट्सअॅप किंवा पेसबूकच्या माध्यमातून एकमेकांना प्राप्त करता येऊ शकतात. जगातले असंख्या स्वरुपाचे ज्ञान, माहितीचा खजिना याच माध्यमातून उपलब्ध करुन येतो. जर इतकी ताकद या फेसबुकइंटरनेट, व्हॉटसअॅपमध्ये असेल त्याचा तितक्याच चांगल्या पध्दतीने उपयोग करण्याचा विवेक आजच्या तरुण पिढीने दखविला पाहिजे. आज्या आधुिनिक जीवनशैलीचा विचार कला तर सगणक आणि त्याच्याशी संबंधित ही सगळी माध्यमे जगण्याचा अविभाज्य भाग झाली आहेत. मग तो मोबाईल असो, इंटरनेट असो, फेसबुक असो किंवा ब्लॉगट्विटरसारखे प्रकार असोदिवसभरात मिळणा-या चोवीस तासांपैकी बारा-बारा तास माध्यमाबरोबर घालविण्याची आजच्या तरुणांवर आलेली आहेही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.प्रत्येक कार्यालयामध्ये किंवा व्यवसाय, उद्योग किंवा कामाच्या कोणत्याही ठिकाणी संगणक, इंटरनेट किंवा फेसबुकसारख्या प्रकारांचा वापर करण्याशिवाय पर्याय राहत नाही. अगदी शिक्षणाच्या क्षेत्रातही ही आधुनिक माध्यमे वापरावीच लागतात. अशा प्रकाराची एकूण परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते. अर्थातच त्या माध्यमाचा स्वतःच्या वैयक्तिक कामाकरिता वापर करून घेण्याचे भान आणि अनावश्यक माहितीसाठी फेसबुकवर, व्हॉट्सअॅपवर तासन्तास वेळ घालविण्याचे वाढते व्यसन यातला समतोल राहिलेला नाही. माहिती तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीमुळे सगळे जग जवळ आल्याचे वारंवार सांगितले जाते. परंतु, हे जवळ येणे इतके आभासी स्वरूपाचे आहे की त्यातून ही माध्यमे वापरणारा माणस स्वत:पासनच कोसो दर जात असल्याचे जाणवते. व्यवसाय, उद्योग, शिक्षण याकरिता ही माध्यमे उपयोगात यावीत आणि नॉलेज वर्कर म्हणून लोकांनी किंवा तरुणांनी त्यात सहभागी व्हायला पाहिजे असा त्यामागे उद्देश असतो. परंत. प्रत्यक्षात ज्ञानवर्धनासाठी या माध्यमाचा होणारा उपयोग आणि ज्ञानाचे निमित्त पुढे करुन अनावश्यक माहितीच्या मायाजाळात अडकून पडण्याचा प्रकार अधिक होताना दिसन येतो. जगभरातला तरुण आपल्या झोपेचे तास कमी करुन फेसबुकवरव्हॉट्सअॅपवर वेळ घालवत असेल आणि त्याच्या या निद्रानाशामुळे गभीर आजाराला सामोर जात असेलतर मात्र एका विचित्र कडेलोटाकडेच त्यानेच वाटचाल सुरू केली आहे असे म्हणायला हरकत नाही. आज आपल्या देशातील तरुणांमध्ये सोशल मिडीया हा प्रकार जास्त प्रमाणात दिसुन येतो. फेसबुकव्हॉट्सअॅप, ट्विटर, ब्लॉग यांचा वाढता प्रभाव पहायला मिळतेएखादी माहिती शेअर करणेएकमेकाशी फेसबुक, व्हाट्सअप तासन्तास गप्पा मारणे किंवा उद्योगव्यवसायाच्या उपयोगासाठी फेसबुकव्यवसायाच्या उपयोगासाठी फेसबुकव्हॉट्सअपचा प्रभावी वापर करणे सगळ्या बाबी होत असल्या, तरीही आज याचा सर्वात जास्त मोठा ग्राहक तरुणवर्ग ठरलेला आहे. कुटूबामधला विसवाद किवा अशा उच्चाशाक्षत तरुणामधल्या वाढत्या आत्महत्या त्यांच्यात वाढत जाणारी व्यसनाधीनता हे सगळे प्रकार फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंटरनेटच्या अतिप्रभावातून निर्माण होत आहेत असे वाटते. आजच्या तरुणानी यापासून सावध राहायला पाहिजे. आपल्या हातातील तंत्रज्ञानाचा वापर करताना आपलया शरीराचे तंत्र बिघडणार नाही याची वळास खबरदारा घ्यायला पाहिज. याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. आह. सिध्दार्थ अ. मोकल ___ - संपादक
सपादकीय दिवटर, इंटरनेट, व्हॉट्सअॅप, फेसबुक च्या वापरावर मर्यादा हवी