कसा पाळला जात आहे राज्यातील लॉकडाऊन

दिवसरात्र चालू असलेले मुंबई शहर




दिवस रात्र समुद्रकिनारी फेरफटका मारणारे समुद्राचे चाहते, राज्याचा संपूर्ण कारभार जिथे हाताळला जातो ते मंत्रालय तसेच राज्यातील असो किंवा बाहेरून आलेली कुठलीही व्यक्ति जी मुंबई शहरामध्ये आल्यावर ताजमहल हॉटेल पहायला येते असे सर्व ठिकान पूर्ण पने ओसाड अशी दिसत आहेत, कधीही शांत नसणारी ही मुंबई पहिल्यांदा इतकी शांत दिसत आहे. (छायाचित्रकार : हुसैन शेख )


 


पुणे शहरातील लक्ष्मी रोड



जेव्हा आठवड्यातून बाजार बंद असेल तेव्हा तुम्हाला कदाचित असेच दुसर्‍या दिवशी लक्ष्मी रोड दिसू शकेल. परंतु कमीतकमी आणखी दोन  आठवडे हे दृश्य होईल, कारण देश लॉकडाऊनमध्ये गेला आहे. (छायाचित्रकार : चाँद सय्यद)


कल्याण शहरातील शिवाजी चौक


कल्याण शहरामधील शिवाजी चौक या ठिकाणी दिवसा मार्केट चालू झाल्यापासून संध्याकाळी मार्केट बंद होईपर्यंत इतकी गर्दी असते की पाय ठेवायला देखील जागा नसते, ते ही शहर आज लॉकडाऊन मध्ये एकटे पडल्यासारखे वाटत आहे.  (छायाचित्रकार : सूर्यकांत कोकाटे)


सातारा जिल्ह्यामधील वडूज गांव 



सातारा जिह्यामधील वडूज हे एक छोटेसे पण पसरलेले असे गांव आहे. या चौकामध्ये सकाळी लवकर भाजीविक्रेते हे भाजी विकण्यासाठी उभे असतात, बरेचशे वडापाव चे देखील या ठिकाणी स्टॉल सकाळी लवकर सुरु होतात, आठवड्याचे आठही दिवस रहदारिने गजबजलेले हे गांव देखील आज संपूर्ण शांत पहायला मिळत आहे,  लॉकडाऊन मध्ये दिवस रात्र पोलिस प्रशासन आपल्यासाठी झटत आहेत डोळ्यात तेल घालून विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये याची काळजी ते घेत आहेत. (छायाचित्रकार : अक्षय लोहार)