वडूज, सातारा (अक्षय लोहार) : श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वडूजच्या वतीने करोना विषाणूच्या प्रादुर्भावाने ओढावलेल्या परीस्थितत जनतेच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या आरोग्याची,कुटुंबाची फिकीर न करता दिवस रात्र सेवा बजावणाऱ्या पोलीस बांधव,आरोग्य कर्मचारी, पत्रकार बंधू,शेतकरी यांना धारकऱ्यांकडून फुल न फुलांची पाकळी म्हणून अल्पोपहार व चहा याचे वाटप करण्यात आले..
सदर कार्यात अलोक महाजन, शुभम ठिगळे, ओंकार गाढवे, संकेत गोडसे, मयुरेश शेटे, चैतन्य ठिगळे, रोहन इंदापूरे, चैतन्य काटवटे, सूरज गुरव, शुभम महाजन या धारकऱ्यांचे सहकार्य लाभले..