पिंपरी/ पुणे (प्रतिनीधि ): करोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गर्दी टाळावी म्हणून अवघ्या देशात सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत ४० ते ५० जणांनी एकत्र येऊन एका इमारतीच्या छतावर नमाज पठण केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी १३ जणांवर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. यापुढेही कारवाई सुरूच राहणार करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आणि संचारबंदीच्या काळात पोलिसांनी आतापर्यंत ३३३ जणांवर कारवाई केली आहे. सर्वात अधिक गुन्हे झोन २ मध्ये दाखल करण्यात आलेले आहेत. यापुढील काळातही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पिंपरी: टेरेसवर सामूहिक नमाज पठण; १३ जणांना अटक