स्मार्ट शहरात मुबई गेली अनेक वर्षे म्हणजे ५० वर्षांहून जास्त काळ मुंबईचे चित्र खराब झालेलले दिसते. सर्व । ठिकाणी काँक्रीटचे जंगल व झोपडपट्टी दिसते. पायाभूत सेवा पुरवताना मुंबई महानगरपालिका आणि सरकारी संस्थांची दमछाक होते. महापालिकेने हाती घेतलेली असंख्य प्रकल्पांची कामे नीट होत नाहीत. रस्ते-नाल्यांची सफाई, मोकळ्या जागांची देखभाल. पिण्याचे पाणी, फेरीवाल्यांची व पार्किंगची सोय, विमानपट्टीवरील ताण आणि ट्रेनची गर्दी, हॉस्पीटलच्या समस्या, दुकानांची अतिक्रमणे, शाळा-कॉलेजना पुरेशी मोकळी जागा देणे, सुरक्षितता, पूरनियंत्रण अशा गोष्टी अशक्य होऊन बसल्या आहेत. वायुप्रदूषण वध्वनिप्रदूषण महापालिकेला थांबविता न येणे, घनकचरा व डम्पिंग यार्ड व स्वच्छता व्यवस्था सांभाळत न येणे यासारख्या समस्यांमूळे देशातल्या स्मार्ट व स्वच्छ शहरांमध्ये मुंबईचा क्रमांकखाली गेला आहे. -जयराम देवजी, मालाड
स्मार्ट शहरात मुबई का नाही ?