विद्यार्थी प्रशासनाला धडा

कल्याण (प्रतिनीधी): गेली अनेक वर्ष कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली येथील शाळेसमोर कचराकुंडी असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे शिवसेनेने प्रशासनाकडे शाळेसमोरील ही कचराकुंडी हटवण्याची मागणी केली आहे. तर, दुसरीकडे याच शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेवून शाळेच्या अजुबजूकडील परिसर स्वच्छ करत पालिका प्रशासनाला एक प्रकारे स्वच्छतेचा धडा शिकवला. डोंबिवली पूर्वेकडील आयरगाव येथ पालिकेचे लाल बहादूर शास्त्री विद्यालय आहे. अनेक वर्षांपासून शाळेच्या भिंतीला लागून पिण्याच्या टाकीजवळ कचराकुंडी प्रशासनाला ठेवली आहे. आजुबाजूला कचरा पडत असल्याने शाळेत दुर्गंधी पसरते. तसेच साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. दरम्यान, श्री. रा. साठी माध्यमिक विद्यालय आणि आयरे गावातील पालिकेची लाल बाहादूर शास्त्री शाळेने गुरुवारी सकाळी समासेवक शिबीर आयोजित केले होते. यावेळी शाळेतील विद्यार्थी, माजी विद्यार्थी  आणि शिक्षक वर्गाने शाळा परिसर स्वच्छ करुन दाखवला. शिवसेना डोंबिवली महिला आघाडीच्या कार्यकत्या निष्ठा भागवतुला याच्यासह नारायणकात भागवतुला, तेजस महागांवकर, डॉ. मीनाक्षी धुंदे-संघवी, ज्योत्स्ना जोशी,