कल्याण-डोंबिवलीत शून्य कचरा मोहीम

कल्याण - डोंबिवली (प्रतिनीधी): यंदाच्या कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या अर्थसंकल्पात शून्य कचरा स्वच्छता मोहिमेवर भर देण्यात येईल व आपआपल्या प्रभागात चांगल्या प्रकारे स्वच्छता मोहीम राबवून सातत्याने शून्य कचरा ध्येय गाठणा-या नगरसेवकांना विशेष अधिक विकासनिधी देण्याची तरतुद असेल, असे संकेत स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी दिले. कोपर रोड आणि कोपर गाव या प्रभागांत रविवारी शिवसेनाप्रमख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रभागातील नागरिकांसमवेत स्वच्छता अभियान राबवून आपल्या घरात ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे महत्व सर्वांना म्हात्रे यांनी पटवून दिले.


स्थायी समिती सभापती म्हणन आपली जबाबदारी व सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या कार्यकाळात कचराकुंडी व डंपिंग ग्राऊंडमुक्क्त कल्याण-डोंबिवली शहर करण्याचे ध्येय समोर ठेऊन सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन व्यापक स्वच्छता चळवळ हाती घेणार आहे. नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे महत्व पटले आहे. परंतू महापालिकेत १९९७ नंतर नोकरभरती झालेली नाही. त्यामूळे वाढत्या लोकसंख्येसमोर हे कर्मचारी अपुरु पडतात. नागरिकांनी वेगळा केलेला कचरा एकाच घटागाडीतून डपिग ग्राऊडवर जात आहे. या गोष्टींचा गांभीर्याने विचार करुन महापालिका क्षेत्रात दहा एक टन क्षमतेचेओला कचरा वापरुन खतनिर्मीती करणारे, तेरा बायोगॅस निर्मान करणारे प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्यात येणार आहेत.तसेच, प्रत्येक प्रभागांत तज्ञांच्या सहकार्याने जागोजाग मोकळ्या जागी पटांगणे, उद्याने तसेच रस्त्याच्या कडेला फ्लावर बेड तयार करुन गांडून खतनिर्मिती प्रकल्प राबवण्याचा मानस आहे जेणेकरुन नागरिकांना आपल्या जवळपासचओला कचरा टाकता


येईल. डंपिंग ग्राऊंडचा डोंगर कच- यातील अविघटनशील प्लस्टिकमुळे वाढत आहे, हे लक्षात घेऊन सक्यशकच-यातील प्लास्टिकच्या पनप्रक्रियेतन इंधन निर्मिती करणारा प्रकल्प महापालकेतर्फे राबवण्याचा विचार सरु आहे. तसेच कच- यापासन वीलनिर्मिती करून त्यावर सर्व पालिका कार्यालये व पथदिवे यासाठी वापर करण्याच्या प्रसतावालाही गती देण्यात येण्ससा असहे, अशी माहिती रमेश म्हात्रे यांनी दिली.स्वच्छता मोहम


राबवताना नगरसेवक व अरोग्य निरीक्षक यांना प्रमुख स्वच्छता दूत म्हणून त्या प्रोगाचे पालकत्व देऊन त्यांनी नागरिकांना प्रोत्साहित करुन लवकरात लवकर शून्य कचरा ध्येय साध्य करावे यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. नागरिकांनी माझा कचरा, माझी जबाबदारी समजन सहकार्य केल्यास आपोआपच त्यांना रोगराईमूक्त सुदृढ आरोग्य मिळेल हीच या मोहिमेची सफलता असेल, असेही शेवटी म्हात्रे यांनी सांगितले.