असा प्रज्ञासूर्य होणे नाही ...!

धुनिक भारताचे भाग्यविधाते, भारतीय संविधानाचे शिल्पकार ज्ञानसूर्य, युगपूरुष, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्यातून जावन ५५ वर्षे झाली. काळ किती झपाटयाने निघून गेला हे कळलेसूध्दा नाही. आपल्या देशात दररोज शेकडा माणसे मरतात. पण जगात काही अशा विभूती असतात, महामानव असतात की, त्यांचे मरण हे सामान्य नसतं. बाबासाहेबांचे मरण है असामान्य हात. बाबासाहबाच्या मरणाचा नाद जगान घतला. त्याचा हातहास झाला. कारण ५५ वषाच्या काळखडात बाबासाहेब आपल्या मध्य नाहात अस कधावाटतच नाही. पाच दशकात दलित समाजात प्रचंड बदल झाला, प्रगती झाली. बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणामुळे तळागळातला माणूस झपाटयाने बदलला. समाज बदलला. समाजाचं राहणीमानं बदललं, विचार बदलले, एवढी प्रचंड क्रांती शिक्षणाने केली. बाबासाहेबांनी कधीही स्वत:चा विचार केला, आपल्या कुटूंबाचा विचार केला नाही. या देशातील कानाकोप-यात, द-या खो-यात राहणा-या, दीन दुबळया दलित, शोषित, शेतकरी शेतमजूर, कष्टकरी कामगार आणि गावकुसाबाहेर जीवन जगणा-या समाजाचा विकासाचा, उन्नतीचा, प्रगतीचा बाबासाहेबांना ध्यास होता. या देशात समतेच्या विचाराचे राज्य याचे गोरगरिब समाजाच राज्य याव असें त्यांना नेहमी वाटायचं. बाबासाहेब हे केवळ प्रकांड पंडित विद्वानच नव्हते, तर महान राजकारणी हेते. सत्तेच्या हव्यासापोटी राजकारणी लोक नेहमीच राजकीय डाव खेळत असतात. त्यात त्यांच्या सोयीच्या तडजोडी केल्या जातात. नेता, प्रसंगी पक्षही बदलतो, विचारही बदलतो, दिलेला शब्द फिरवतो, अशा नेत्यांना एक दिवस तरी आपला राजकीय हिशोब समाजात द्यावा लागातो.


बाबासाहेबांनी असं राजकारण कधीच केल नाही. कारण त्यांच्या राजकारणाला सामाजिक क्रांतीचा आधार होता. म्हणून बाबासाहेब राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षितीजावरील तेजपर्व ठरले.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जातीयता, वर्णव्यवस्था व विषमता यांचे विरुध्द लढणारे एक महान याद हात. प्रस्थापित समाज व्यवस्थला हादरवून टाकणारा त्याचा विचार हा काटयावधा लोकाचा प्ररणास्त्रोत ठरला व दालत वगाला सातत्यान प्ररणादाया ठरला म्हणूचन बाबासाहेबांचे निकटचे सहकारी रा. ब. एन. शिवराज असे म्हणाले होते की, “ डेड आंबेडकर इज मोर पॉवर फूल देन दी अलाय" बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करताना आचार्य अत्रेही म्हणाले हेते की, “ मृत । आंबेडकर हे जीवंत आंबेडकरांपेक्षा " अधिक शक्तिशाली ठरले". - बाबासाहेबांना जावून जसजसी अधिक वर्षे लोटत आहेत तसतसी त्यांची सत्यता प्रखरपणे जाणवत आहे. भारतातील पददलित वर्गाचा उद्दार हे त्यांनी आपल्या जीवनाचे उद्दिष्ठ ठरविले आहे. ते देश उध्दाराचे महान कार्य आहे. याच दृष्टीने ते त्याकडे पाहत होते. अन्याय अत्याचाराचा प्रतिकार करत होते. कारण देशाच्या एक पंचमांश लोकसंख्येला गुलामीचे जीवन जगायला लावून कोणताही देश आपली उन्नती साधू शकणार नाही. याची त्यांना पूरेपूर जाणीव होती. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व सामाजिक न्याय यावर आधारलेली समाजव्यवस्था निर्माण करणे हे त्यांनी आपल्या जीवनांचे तत्वज्ञान मानले होते. त्याची सुंदर गुंफण त्यांनी भारतीय संविधानात केलेली आहे. 


असा प्रज्ञासूर्य होणे त्यांच्या या मानवतावादी विचाराने केवळ भारतातील नव्हे तर जगातील विचारवंतांना झपाटून टाकले आहे. __ म्हणूनच जागतिक पातळीवर आंबेडकर विचारावर सर्वाधिक संशोधनात्मक परिशिलन होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात समतेच्या विचारांचे आणि परिवर्तनाचे बीज पेरले म्हणूनच गावकुसाबाहेर जीवन जगणा-या बहुजन समाजाला होणे प्रगतीचे पंख फुटले. म्हणून बाबासाहेबांच्या विचारांचा हा निखारा, विचाराचा हा अग्नि धगधगत ठेवण्याची जबाबदारी आज प्रत्येकाची आहे. भ्रष्ट राजकारणी, धनदांडगे, काळया पेशावाले लोक समाजसेवेचा आणि देशसेवेचा खोटा मुखवटा परिधान करुन राजकारणात उतरत आहेत. त्यामूळे प्रजासत्ताक भारताची लोकशाही आता धोक्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र संघात (युनो) दलित अत्याचारा संदर्भात एक अहवाल प्रसिध्द केला आहे. या अहवालात त्यांनी म्हटले आहे की, भारतात दररोज तीन दलित महिलांवर गावातील गाव गुंडांकडून बलात्कार होतात. प्रत्येक आठवडयात देशांत कोठे तरी किमान पाच दलितांच्या घरांची गुंडांकडून जाळपोळ होते. सहा दलितांचे अपहरण केले जाते. अकरा दलितांना मारहाण होते. तेरा दलितांची हत्या होते. तर पुरोगामी आणि परिवर्तनाचा विचार जगाला सांगण्या-या या देशाची ही वस्तुस्थिती आहे. वास्तव परिस्थिती आहे म्हणून बाबासाहेब आज तुमची आवश्यकता आहे पण बाबासाहेब || तुम्ही आज आमच्यात नाहीत. असा हा महा मावळला असला तरी, कार्याच्या | रुपाने अमर आहे म्हणूनच एक।। शाहीर म्हणतो __केलीस भीमा तू कीर्ती, लाजविलीसधरती सूर्य-चंद्र जोवर वरती, अशी केलीस महान कीर्ती


                                                                                                                     -संपादक श्री. सिध्दार्थ अ. मोकळ