आ.प्रकाशसुर्वे यांच्या अटकेसाठी तृप्ती देसाई यांचा डीसीपी कार्यालयावर मोर्चा

 शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे हेच आपले जैविक वडील असल्याचे सांगणा-या राज कोरडे या तरुणाला न्याय मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मंगळवीर बोरीवली पोलिस उपायुक्त (डीसीबी) कार्यालयावर मोर्चा नेला. मोर्चाची दखल घेत पोलिस सहायक आयुक्त नंदकिशोर मोरे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक ग्णाजी सावंत यांनी आमदार सुर्वे व त्यांचे व्यावसायिक भागीदार गणेश नायड, विपल दोशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे आश्वासन दिले. राज कोरडे या तरुणाने आमदार सुर्वे हे आपले वडील असून डीएनए चाचणी करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केला होती. याचिका दाखल झाल्याची माहिती मिळल्यानंतर सुर्वे यांच्या सांगण्यावरून यांचे व्यावसायिक भागीदार नायडू यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून राजचे मुंबईहून सुरतला अपहरण केले होते. त्याची आई उज्वला यांनी याविरोधात बोरिवली ठाण्यात धाव घेतली, पण पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली नाही. याबाबत गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे उज्वला यांना कैफियत मांडली असता डॉ. पाटील यांनी पोलिसांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. पण, बोरिवली पोलिसांनी ही तक्रार गणेशपुरी (जि. ठाणे) पोलिसांकडे वर्ग केली. तेथील पोलिसांनी सर्व जाबजबाब व तपास केला, पण अपहरणाची घटना बोरिवली पेलिसांच्या हद्दीत घडली असल्याचे सांगत संबंधित फाईल मुंबई पोलिसांकडे पाठविली. मुंबई व ठाणे पोलिसांची चालढकल पाहता आपल्याला न्याय मिळणार नाहीअसे वाटल्याने राज व त्याच्या आई उज्वला यांनी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली. त्यानुसार मंगळवारी देसाई यांनी बोरिवली पोलिस उपायुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. सदर प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल न केल्यास आमदार सुर्वे यांच्या घरासमोर ठिय्या तसेच नागपूर विधानभवनासमोर आंदोलन करण्याचा इशारा देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. देसाई यांची आक्रमक भूमिका पाहून सहायक पोलिस आयुक्त मोरे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावंत यांनी दोन दिवसात कारवाई करु, असे देसाई यांना लेखली आश्वासन दिले. या आंदोलनात मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा शीतल म्हात्रे, शिवा शेट्टी, गणेख्श यादव तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रांतिल कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.