हॅपी स्ट्रीट कार्यक्रमामुळे ठाण्यातील वाहतुकीत बदल

 ठाणे (प्रतिनीधी): ठाणे शहरातील नागरिकांकरिता गॅल्डी अल्वारीस रोडवर २६ नाव्हेंबर ते ११ फेबुवारी या दरम्यान दर रविवारी हॅपी स्ट्रीट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येत नागरिक सहभागी होणार असल्याने या परिसरातील वाहतुककोंडी टाळण्यासाठी वाहतुकतीत बदल  करण्यात आले आहेत. या काळात हिरानंदानी मिडॉस, पवारनगर, लोक हॉस्पिटल व इतर भागातून टिकुजीनीवाडी- मानपाडा बाजूकडे जाणा-या लोक हॉस्पिटल चौक ते हॅपी व्हॅली चौक दरम्यान जाणा-या वाहिनीवर सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रवेश बंद करण्यात येणार आहे. तर, या मार्गावरील सदरची वाहने हिरानंदानी मिडॉस, पवारनगर, वसंत विहार सर्कलकडून डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह चौक ते हॅपी व्हॅली मार्गे टिकुजीनीवाडी-मानपाडा बाजूकडून येणा-या एकाच वाहिनीवरुन जातील. लोक हॉस्पीटल चौक ते हॅप्पी व्हॅली चौक या दरम्यान रस्त्याचे दोन्ही बाजूस सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. ही वाहततूक अधिसूचना २६ वाहतुकीत बदल नोव्हेंबर ते ११ फेब्रुवारी २०१८ रोजी दरम्यानच्या दर रविवारी सकाळी ५ ते ११ वाजेपर्यंत काळा ५ त ११ वाजपयत करण्यात आली आहे. पोलिस वाहने, रुग्णवाहिकाफायरब्रिगेड व अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू नाही पोलिस उप आयुक्त, शहर वाहतूक शाखा अमित काळे यांनी कळविले आहे.