भारतातील ७८० भाषांपैकी ४०० भाषा येत्या ५० वर्षांत | |नामशेष होण्याची शक्यता आहे. ।। |इंग्रजी भाषेमुळे भारतातील हिंदी, मराठी, बंगाली आणि तेलगू या मुख्य भाषांच्या अस्तित्वाला धोका नसला तरी मराठी भाषेचा वार वाढलाच पाहिजे. भाषा लुप्त होण्याचे प्रमुख कारण इतर भाषांचा वापर आणि भाषांची खंटलेली प्रगती आहे. आपली मराठी भाषा ही फक्त संवादाचे साधन नसते, तर ती असते आपला श्वास आणि जगण्याचा ध्यास. आमची नवी पिढी इंग्रजीच्या पाहिजे आमिषाने मराठीपासून दूर चालली आहे. नवी पिढी मराठी भाषेपाठोपाठ संस्कृती आणि संस्कारांपासून दूर चाललेली दिसते. लेखक, कवी. विचारवंत यांच्यापेक्षा भाषेचा प्रसार हा राजसत्तेकडून जास्त प्रमाणात होतो. हे मात्र मराठी लोकांना कळत असूनही वळत नाही. येणा-या काळाची आव्हाने समजून घेऊन इंग्रजीला कमी न लेखता मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांच्या विकासाचे उत्तम तंत्र आपण सर्वांनी आत्मसात करण्याची गरज आहे. - विवेक तवटे. कळवा
मराठी भाषा जपली पाहिजे
• Siddharth Mokal